Alcoholics Anonymous अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस

It began at a
hospital bedside.
सुरुवात झाली होती
हॉस्पिटलच्या एका बेडजवळ.

In 1935, Dr. Bob carried the message to over 5,000 alcoholics in Akron's hospital beds. A.A.'s third member was found in one of them. Every 1st October, we go back.

१९३५ मध्ये डॉ. बॉब यांनी अ‍ॅक्रनच्या हॉस्पिटलमधील ५,०००हून अधिक मद्यपींपर्यंत संदेश पोहोचवला. ए.ए.चा तिसरा सभासद हॉस्पिटलच्या बेडवरच सापडला. दर १ ऑक्टोबरला आपण पुन्हा तिथे जातो.

Dateतारीख 1st October 2026 १ ऑक्टोबर २०२६
Timeवेळ 9:00 AM – 1:00 PM सकाळी ९ ते दुपारी १
Placeठिकाण Your nearest hospital — OPD तुमच्या जवळचे हॉस्पिटल — ओपीडी
What your group does ↓ तुमच्या ग्रुपने काय करायचं ↓
Why hospitals हॉस्पिटलच का

The alcoholic is already there. मद्यपी आधीच तिथे असतो.

An alcoholic is no stranger to the hospital — detox at the end of every spree, then home again. Many of us were that patient.

Very few doctors know there is somewhere to send us next. When they do, the person in that bed gets more than a discharge slip. They get a way out.

मद्यपीला हॉस्पिटल नवीन नाही — प्रत्येक पिण्याच्या सत्रानंतर डिटॉक्स, मग पुन्हा घरी. आपल्यापैकी अनेक जण तोच रुग्ण होतो.

पुढे कुठे पाठवायचं, हे फार थोड्या डॉक्टरांना माहीत असतं. ते समजलं, की त्या बेडवरच्या माणसाला फक्त डिस्चार्ज स्लिप मिळत नाही — बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो.

1st October 2025 १ ऑक्टोबर २०२५

One idea reached 200+ hospitals. एक कल्पना — २००+ हॉस्पिटलपर्यंत.

It began as one simple idea: for one morning, members would stand at hospital gates with pamphlets and meeting lists. Written permissions came from 35+ hospitals around Pune. Then word spread — 25+ districts, 11+ states.

On 1st October 2025, around 300 members stood at stalls in 200+ government and private hospitals across India — same day, same time. The news ran in 70+ newspapers. At noon, everyone joined one Zoom call for a few minutes, just to share it.

Then the calls began. Twelve-step calls from hospitals. Requests to start meetings on their premises. Administrators asking us to come back.

सुरुवात एका साध्या कल्पनेने झाली: एका सकाळपुरतं सभासदांनी पुस्तिका आणि मीटिंग याद्या घेऊन हॉस्पिटलच्या दारात उभं राहायचं. पुणे परिसरातील ३५+ हॉस्पिटलच्या लेखी परवानग्या मिळाल्या. मग बातमी पसरली — २५+ जिल्हे, ११+ राज्ये.

१ ऑक्टोबर २०२५ रोजी सुमारे ३०० सभासद देशभरातील २००+ सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये स्टॉलवर उभे होते — एकाच दिवशी, एकाच वेळी. ७०+ वृत्तपत्रांत बातमी आली. दुपारी बाराला सगळे काही मिनिटं एका झूम कॉलवर जमले — फक्त तो क्षण वाटून घ्यायला.

आणि मग कॉल सुरू झाले. हॉस्पिटलमधून बारा पायऱ्यांचे कॉल. आवारात मीटिंग सुरू करण्याच्या विनंत्या. "पुन्हा या" म्हणणारं प्रशासन.
200+
hospitals, one morningहॉस्पिटल, एकाच सकाळी
25+
districts of Maharashtraमहाराष्ट्रातील जिल्हे
11+
states joined inराज्ये सामील
70+
newspapers carried itवृत्तपत्रांत बातमी
1st October 2025 — one morning of unity and service. १ ऑक्टोबर २०२५ — एकता आणि सेवेची एक सकाळ.
1st October 2026 — every year now १ ऑक्टोबर २०२६ — आता दरवर्षी

This year, the message stays on. यंदा संदेश वर्षभर तिथे राहील.

The stall runs 9 to 1, like last year. But when we fold it up, two things stay on at the hospital:

स्टॉल गेल्या वर्षीसारखाच — सकाळी ९ ते १. पण यंदा तो आवरल्यावर दोन गोष्टी हॉस्पिटलमध्येच राहतील:

The stall — one morning स्टॉल — एक सकाळ
9 to 1 at the OPD. Members, pamphlets, meeting lists — and time to talk. सकाळी ९ ते १, ओपीडीजवळ. सभासद, पुस्तिका, मीटिंग याद्या — आणि बोलण्यासाठी वेळ.
The standee — all year स्टँडी — वर्षभर
A 6×3 ft A.A. standee at the OPD, standing long after we leave. ओपीडीमध्ये ६×३ फूट ए.ए. स्टँडी — आपण गेल्यावरही उभी.
The rack — always full रॅक — नेहमी भरलेले
A wall rack of pamphlets, refilled through the year by the nearby group. भिंतीवरचे साहित्य रॅक — जवळचा ग्रुप वर्षभर भरत राहील.

Slowly, a relationship with the doctors grows — until every doctor has the local A.A. helpline saved in their phone, and gives it to the patient who needs it.

The vision: doctors begin referring alcoholic patients to A.A. after treatment.

हळूहळू डॉक्टरांशी नातं तयार होतं — प्रत्येक डॉक्टरच्या फोनमध्ये स्थानिक ए.ए. हेल्पलाइन सेव्ह होईल आणि गरजू रुग्णाला ती दिली जाईल, इथपर्यंत.

दृष्टी: डॉक्टर उपचारानंतर मद्यपी रुग्णांना ए.ए.कडे पाठवू लागतील.
Not an experiment. In the US, A.A. committees have kept literature racks stocked in hospitals and waiting rooms for over fifty years. We are walking a road the fellowship has already built. हा प्रयोग नाही. अमेरिकेत ए.ए.च्या समित्या पन्नासहून अधिक वर्षे हॉस्पिटल व प्रतीक्षालयांत साहित्य रॅक भरलेली ठेवत आल्या आहेत. फेलोशिपने आधीच बांधलेल्या रस्त्यावरून आपण चालत आहोत.
Group level — this is where it happens ग्रुप पातळीवर — इथेच सगळं घडतं

What your group does तुमच्या ग्रुपने काय करायचं

  1. Identify a nearby major hospital जवळचे मोठे हॉस्पिटल निवडा
    Government or private — one your group can look after all year, not just on 1st October. सरकारी किंवा खासगी — फक्त १ ऑक्टोबरला नाही, तर वर्षभर तुमचा ग्रुप सांभाळू शकेल असे.
  2. Get written permission from the administration प्रशासनाकडून लेखी परवानगी घ्या
    One letter, three requests: एक पत्र, तीन विनंत्या:
    • An A.A. awareness stall on 1st October 2026, 9 AM – 1 PM
    • A permanent 6×3 ft A.A. standee at the OPD
    • A wall-hanging A.A. literature rack or folder with pamphlets
    • १ ऑक्टोबर २०२६, सकाळी ९ ते दुपारी १ — ए.ए. जागृती स्टॉल
    • ओपीडीमध्ये कायमस्वरूपी ६×३ फूट ए.ए. स्टँडी
    • पुस्तिकांसह भिंतीवरील ए.ए. साहित्य रॅक / फोल्डर
    Draft letters in Marathi and English are ready with the committee — just ask. मराठी व इंग्रजी पत्रांचे मसुदे समितीकडे तयार आहेत — फक्त मागा.
  3. Collect about ₹3,000 and inform the committee सुमारे ₹३,००० जमवा आणि समितीला कळवा
    It pays for your group's standee and rack, designed centrally by the committee. Collect from home-group members; the group can add from its treasury too. When it's ready, call the committee (numbers below). यातून तुमच्या ग्रुपची स्टँडी व रॅक तयार होईल — रचना समिती करेल. होमग्रुप सभासदांकडून जमवा; ग्रुपच्या तिजोरीतूनही भर घालता येईल. रक्कम जमली की समितीला कळवा (क्रमांक खाली).
  4. Be there — 1st October, 9 AM to 1 PM हजर राहा — १ ऑक्टोबर, सकाळी ९ ते १
    Set up the stall, install the standee and the rack — and hand the message to whoever reaches for it. स्टॉल लावा, स्टँडी व रॅक बसवा — आणि जो हात पुढे करेल त्याच्या हातात संदेश द्या.
On the day त्या दिवशी

Your group's checklist तुमच्या ग्रुपची यादी

At every stall प्रत्येक स्टॉलवर

A register on the table टेबलावर एक नोंदवही

Every stall keeps a register for incoming enquiries — a name, a number, a quiet word. After 1 o'clock, every entry becomes a 12-step call.

प्रत्येक स्टॉलवर येणाऱ्या चौकशींसाठी एक नोंदवही असेल — नाव, नंबर, दोन शब्द. दुपारी एकनंतर प्रत्येक नोंद एक बारा पायऱ्यांचा कॉल बनते.

That register is why we're there. The banners come down; the names in it don't. ही नोंदवही हेच त्या सकाळचं फलित. बॅनर उतरतात; त्यातली नावं राहतात.
For the years ahead पुढच्या वर्षांसाठी

The hospital list — live on this website हॉस्पिटलची यादी — याच वेबसाइटवर

Every hospital that says yes goes on a list we will maintain actively here on aapune.org — the hospital, what stands there, and which group looks after it. Next year, nobody starts from zero.

होकार देणारं प्रत्येक हॉस्पिटल याच वेबसाइटवर — aapune.org वर — सतत अद्ययावत ठेवल्या जाणाऱ्या यादीत नोंदवलं जाईल: हॉस्पिटल, तिथे काय आहे, आणि कोणता ग्रुप ते सांभाळतो. पुढच्या वर्षी कोणालाही शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही.

Permission confirmed? Send the hospital's name to the committee — it goes on the list. परवानगी मिळाली? हॉस्पिटलचे नाव समितीला कळवा — ते यादीत नोंदवले जाईल.
Beyond the hospital gate हॉस्पिटलच्या दाराबाहेर

Spreading the word online ऑनलाइन प्रचार

The ₹50,000 remaining from the Golden Jubilee will go, steadily, into promoting this initiative on social media — so that on the day, a suffering alcoholic anywhere sees one simple message and walks in:

"Choose a hospital near you — 1st October 2026, 9 AM to 1 PM."

सुवर्ण महोत्सवातील शिल्लक ₹५०,००० टप्प्याटप्प्याने या उपक्रमाच्या सोशल मीडिया प्रचारावर खर्च होतील — जेणेकरून त्या दिवशी कुठल्याही त्रस्त मद्यपीपर्यंत एकच साधा संदेश पोहोचेल आणि तो चालत आत येईल:

"तुमच्या जवळचे हॉस्पिटल निवडा — १ ऑक्टोबर २०२६, सकाळी ९ ते दुपारी १."
Event committee आयोजन समिती

Inform us. Ask us anything. आम्हाला कळवा. काहीही विचारा.

Hospital chosen? Permission in hand? ₹3,000 ready? Need the draft letter? Call.

हॉस्पिटल ठरलं? परवानगी मिळाली? ₹३,००० जमले? पत्राचा मसुदा हवा? फोन करा.

Event Coordinatorसमन्वयक
Mukund K.
Event Coordinatorसमन्वयक
Sarang K.